तुम्हाला नुकताच मिळालेला व्हॉट्सॲप फॉरवर्ड खरा आहे का हे कसे ओळखायचे? सीजेपीचे हेट हटाओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे सोशल मीडिया आणि मेसेजिंग प्लॅटफॉर्म्सवर विशेषत: व्हॉट्सॲपवर फेक-हेट न्यूजचा महापूर ओळखण्यासाठी आणि रोखण्यासाठी तुमच्यासाठी एक मार्गदर्शक

28, Feb 2023 | Dr Jasbeer Musthafa Mamalipurath

चुकीची माहिती आणि हेट स्पीचचे खूप वास्तविक परिणाम होतात. एखाद्या व्यक्ती किंवा समूहाबद्दल द्वेष व्यक्त करणारी किंवा हिंसेला प्रोत्साहन देणारी सार्वजनिक भाषणे, लोकांच्या समूहाला बदनाम करण्यासाठी रचलेल्या बनावट कहाण्या, खोटे उपचार, अशास्त्रीय रोगप्रतिबंधक उपाय आणि कटकारस्थानांचे सिद्धांत यांमुळे नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. या गोष्टी जनमतही दूषित करत आहेत.

चुकीची माहिती म्हणजे काय; आणि चुकीची माहिती आणि अपप्रचार (खोटी माहिती) यात काय फरक आहे?

चुकीची माहिती – म्हणजे असा कोणताही मजकूर ज्यात चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती आहे, परंतु ती पसरवणाऱ्या व्यक्तीला ती खरी आहे असे वाटते. या बऱ्याचदा अनवधानाने झालेल्या या चुका असतात जसे की चुकीची फोटो कॅप्शन्स, तारखा, आकडेवारी, भाषांतर किंवा विडंबन गांभीर्याने घेतले जाते तेव्हा.

CJP is dedicated to finding and bringing to light instances of Hate Speech, so that the bigots propagating these venomous ideas can be unmasked and brought to justice. To learn more about our campaign against hate speech, please become a member. To support our initiatives, please donate now!

अपप्रचार – म्हणजे बनावट किंवा जाणूनबुजून फेरफार केलेले लेखी / ऑडिओ / व्हिज्युअल साहित्य/कंटेंट आणि जाणीवपूर्वक रचलेले कटकारस्थानांचे सिद्धांत किंवा अफवा. अपप्रचार हीदेखील चुकीची माहितीच असते. परंतु, चुकीच्या माहितीच्या विपरीत अपप्रचार करणाऱ्या व्यक्तीला ती माहिती खोटी आहे याची कल्पना असते. हे जाणूनबुजून, हेतुपुरस्सर सांगितलेले असत्य असते आणि वाईट हेतू असलेल्या व्यक्तींद्वारे ज्या लोकांबद्दल सक्रियपणे चुकीची माहिती पसरवली जात आहे त्यांच्याकडे बोट दाखवते. अपप्रचार म्हणजे राजकीय, आर्थिक आणि इतर फायद्यासाठी जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवणे. अपप्रचार हा वैचारिकदृष्ट्या प्रोपागंडाच्या जवळ आहे.

भारतात व्हॉट्सॲप हे मित्रमैत्रिणी, कुटुंबीय आणि सहकाऱ्यांसोबत नेटवर्किंगचे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. आणि सोशल नेटवर्किंगसाठीदेखील. पण चुकीची/खोटी माहिती पसरवण्याचे प्रमुख माध्यम म्हणूनही व्हॉट्सॲपचा वापर केला जातो का?  

सध्या, ईएनएस इकॉनॉमिक ब्युरोने २०२० मध्ये केलेल्या अभ्यासानुसार भारतात ५० कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. आणि स्मार्टफोन ॲप्लिकेशन्समध्ये व्हॉट्सॲप हे प्रचंड लोकप्रिय आहे, ज्याचे ४० कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत. सामान्य परिस्थितीत, ॲप्लिकेशनचे बरेच वापरकर्ते अनेक व्हॉट्सॲप ग्रुप्सचा भाग असतील. आणि या ग्रुप्सच्या माध्यमातून देवाणघेवाण होणाऱ्या संदेशांमध्ये गुड मॉर्निंग, मोटिव्हेशनल कोट्सपासून ते मेडिकल रिपोर्ट्सचा समावेश होतो. व्हॉट्सॲपच्या अफाट लोकप्रियतेमुळे राजकीय संवादासाठी एक महत्त्वाचे आणि अनेकदा धोकादायक साधन बनले आहे.

अलीकडील अभ्यासामध्ये असे दिसून आले आहे की गोरक्षणाच्या बाबतीत – हिंदुत्वाच्या चळवळीतील एक प्रमुख कार्य – एखादी अफवा किंवा चकमक हिंसेमध्ये परिवर्तित होऊ शकते असे वातावरण तयार करण्यात व्हॉट्सॲपची मूलभूत भूमिका होती. अनेकदा या हिंसेचा शेवट हत्येत होतो (मुखर्जी, २०२०).

अभ्यासामध्ये असेही दिसून आले आहे की, भारतात व्हॉट्सॲप ग्रुप्सचा वापर केवळ द्वेष पसरवण्यासाठीच नाही तर हिंसाचाराच्या कृत्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठीही केला गेला आहे.

आता प्रश्न असा आहे की या अपप्रचाराशी लढायचे कसे?

कोविड महासाथीमुळे आपल्याला विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी धोरण विकसित करावे लागले. ज्याला सामान्यतः ‘टेस्ट-आणि-ट्रेस’ पद्धत असे म्हणतात. चुकीची माहिती/अपप्रचार आणि हेट स्पीचचा प्रसार रोखण्यासाठी काही अंशी हाच दृष्टिकोन अवलंबला जाऊ शकतो.

उदाहरणार्थ,

(१) ऑनलाइन कन्टेन्टची अचूकता तपाससा;

(२) मागे जाऊन त्याचा स्रोत ट्रेस करा; आणि

(३) तो अधिक पसरू नये म्हणून त्याला वेगळे करा.

लक्षात ठेवा, केवळ काही अंशी!

पण व्हॉट्सॲपवर काही वेळा परिस्थिती अधिक गुंतागुंतीची असते. व्हॉट्सॲपवरील कन्टेन्टचा उगम शोधणे जवळजवळ अशक्य आहे. साध्या टॅप किंवा स्वाईपने व्हिडिओ, ऑडिओ क्लिप्स आणि फोटो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात.

म्हणूनच आपल्या संपर्क व्यक्तींशी, विशेषतः आपल्या सर्वात जवळच्या लोकांशी, त्यांनी शेअर केलेल्या चुकीच्या माहितीबद्दल/अपप्रचाराबद्दल बोलणे आपल्याला माहित असणे खूप महत्वाचे आहे.

आपल्या व्हॉट्सअॅप किंवा त्यासारख्या चॅटिंग प्लॅटफॉर्म्सद्वारे चुकीची माहिती/अपप्रचार पसरवण्यापासून रोखण्यासाठी येथे काही टिपा आहेत.

टिप क्रमांक १: नेहमीच साशंक रहा – तुम्ही त्याची पडताळणी केल्याशिवाय कोणताही कन्टेन्ट शेअर करू नका.

टिप क्रमांक २: कोणत्याही कंटेंटबद्दल शंका वाटत असल्यास संशयास्पद व्हॉट्सॲप मेसेजमधील कीवर्ड्स सर्च करा. सर्च परिणामांमध्ये तुम्हाला कदाचित पडताळणी केलेले लेख प्रथम दिसून येतील, ज्यामुळे तुम्हाला मेसेजची सत्यता निश्चित करण्यात मदत होईल.

टिप क्रमांक ३: जर मेसेज तुमच्यामध्ये टोकाच्या भावना निर्माण करत असेल; जर कन्टेन्ट तुम्हाला अल्पसंख्याक समुदायाविरुद्ध कृती करण्यास प्रवृत्त करत असेल; जर तो अनेक वेळा फॉरवर्ड केला गेला असेल (पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केली गेली आहे असे सांगणारे दुहेरी बाणाचे चिन्ह पहा); जर इमेज फेरफार केलेली किंवा संपादित केलेली वाटत असेल तर तुम्ही पाहत असलेला कन्टेन्ट हा बहुधा चुकीची माहिती किंवा दिशाभूल करणारी माहिती असण्याची शक्यता आहे.

टिप क्रमांक ४: जर तुम्हाला मेसेज संशयास्पद वाटत असेल, तुम्हाला मिळालेले फोटो किंवा मीम्स, व्हिडिओ किंवा व्हॉईस नोट्समध्ये हल्ल्याचे किंवा हिंसाचाराचे आवाहन केले असेल आणि त्यात एखाद्या समुदायाचा द्वेष करणारे मेसेज असतील तर ते शेअर करू नका. तो तिथेच थांबवा! तो डिलीट करा!

टिप क्रमांक ५: जर तुम्हीदेखील, आमच्याप्रमाणेच, या चुकीच्या/खोट्या माहितीच्या प्रसारामुळे चिंतीत असाल; आणि गुन्हेगारांवर कारवाई व्हावी अशी तुमची इच्छा असेल तर, मग तो कन्टेन्ट आम्हाला म्हणजेच सीजेपीला पाठवा. आम्ही तुम्हाला तो दुरुस्त करण्यास आणि द्वेषाचा फुगा फोडण्यास मदत करू.

हा व्हिडिओ तुम्ही येथे पाहू शकता:

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Go to Top
Nafrat Ka Naqsha 2023