‘मुस्लिम लोकसंख्येचा विस्फोट’ झाल्याच्या खोट्या दाव्यांचा पर्दाफाश! मुस्लिमांची लोकसंख्या हिंदूंच्या लोकसंख्येला मागे टाकत असल्याच्या एडव्होकेट अश्विनी उपाध्याय यांच्या दाव्याबाबत सीजेपीने तुमच्यासाठी डेटा-समर्थित हेट-बस्टर आणले आहे.

08, Jun 2023 | CJP Team

अल्पसंख्याकांची लोकसंख्या वाढत असल्याचे दावे अनेक वर्षांपासून केले जात असून ते द्वेष आणि संशय निर्माण करण्यासाठी केले जात आहेत. वारंवार पसरवल्या जाणाऱ्या या मिथकाचा सीजेपीने पर्दाफाश केला आहे आणि असे सर्व दावे खोडून काढण्यासाठी एक हेट-बस्टर आणले आहे.

हा लेख सीजेपीच्या हेट-बस्टर्सच्या चार भागांच्या मालिकेतील पहिला आहे. कट्टर उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी केलेल्या धोक्याच्या दाव्यांची वस्तुस्थिती तपासून त्यात ते तुमच्यासमोर मांडले आहे. या मालिकेच्या पहिल्या भागात सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि भाजपचे दिल्लीचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी भारतातील मुस्लिम आणि हिंदू लोकसंख्या वाढीबाबत केलेले चिंताजनक दावे तपासून त्यांचे खंडन केले आहे. इतर पूर्वग्रहदूषित कायदेशीर उपायांबरोबरच ‘मुस्लिमांना लक्ष्य’ करण्याचा वारंवार प्रयत्न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने या वकिलाला फटकारले आहे. जरी ही विधाने उपाध्याय या एका व्यक्तीची असली तरीही व्यापक पक्षीय प्रोपागंडाच्या मुळाशी एकत्र येणारा पैसाउजव्या विचारसरणीची संघटनात्मक शक्ती यातून निर्माण झालेल्या आणि टिकवलेल्या द्वेषाच्या वातावरणाची ही विखुरलेली उदाहरणे आहेत. एखादे भाषणपुस्तक किंवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयात वाईट हेतूने दाखल केलेली जनहित याचिका (लक्षात घ्या की यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाने सहा वेळा कडक शब्दात ताशेरे ओढून देऊन त्यांचे प्रयत्न फेटाळून लावले होते!) यामधून अशी विधाने निर्माण केली गेली की ती थांबवता येत नाहीतटीव्हीइंटरनेट आणि इन्स्टंट मेसेजिंग ऍप्लिकेशन्सच्या बाहेर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते. त्यांचे उद्दिष्ट स्पष्ट असतेते म्हणजे समाजात द्वेष आणखी खोल रुजवणे

या मालिकेचा भाग २४ तुम्ही येथेयेथे आणि येथे वाचू शकता.

CJP is dedicated to finding and bringing to light instances of Hate Speech, so that the bigots propagating these venomous ideas can be unmasked and brought to justice. To learn more about our campaign against hate speech, please become a member. To support our initiatives, please donate now!

अश्विनी उपाध्याय यांनी कॅपिटल टीव्हीचे होस्ट आणि मुख्य संपादक, डॉ मनीष कुमार यांच्यासह कॅपिटल टीव्हीद्वारे प्रसारित केलेल्या “इज इंडिया मूव्हिंग टुवर्ड्स पार्टीशन” (भारत फाळणीच्या दिशेने वाटचाल करत आहे का?) या कार्यक्रमाच्या सेगमेंटमध्ये हे दावे केले आहेत. हा संपूर्ण कार्यक्रम तुम्ही येथे पाहू शकता.

दावा: मुस्लीम लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, ती हिंदू लोकसंख्येला मागे टाकेल.

खंडन: विविध अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, मुस्लिमांची लोकसंख्या स्थिर आहे, प्रजनन दर कमी होत आहे आणि हिंदूंच्या लोकसंख्येला मागे टाकणे अपेक्षित नाही. सध्याचे ट्रेंड्स आणि १९४७ पासूनची लोकसंख्येची आकडेवारी हे दर्शवते की दोन्ही धर्मांच्या लोकसंख्येच्या आकड्यात मोठा फरक आहे. हिंदूंचा प्रजनन दर स्थिर आहे, मुस्लिमांचा प्रजनन दर कमी होत चालला आहे. तज्ञांच्या मते, शंभर कोटींपैकी ८०% लोकसंख्येला १३% अल्पसंख्याक मागे टाकू शकतील असे समजणे, हा लोकांच्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे!


Source: Pewresearch.org

जनगणनेची आकडेवारी या राजकारण्यांच्या दाव्यांचे समर्थन करते का?

भारत सरकारने शेवटची जनगणना २०११ मध्ये केली होती. त्यामुळे, उपलब्ध आकडेवारीनुसार भारतातील मुस्लीम लोकसंख्या अंदाजे १४.२% आहे. त्यानुसार, हे हिंदू धर्मानंतर, इस्लामला भारतातील दुसरा सर्वात मोठा धर्म बनवते, ज्यामध्ये सुमारे 79.8% लोकसंख्या समाविष्ट आहे – दोन धार्मिक’ गटांमध्ये मोठ्या प्रमाणात संख्यात्मक फरक आहे. जनगणनेची आकडेवारी, एनएफएचएस सर्वेक्षणे आणि जागतिक थिंक टँकची माहिती एकत्र केल्यास, उजव्या विचारसरणीच्या लोकांचे धोक्याचे दावे हे फसवे आहेत असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.

भारतातील लोकसंख्येच्या आकडेवारीवर बारकाईने नजर टाकूया.

आता केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीर आणि लक्षद्वीप बेटे या दोन पूर्वीच्या राज्यांमध्येच फक्त मुस्लीम लोकसंख्या बहुसंख्य आहे.

५ अशी राज्ये आहेत जिथे हिंदू लोकसंख्या बहुमतात असून तेथील मुस्लीम लोकसंख्या लक्षणीय मानली जाते. इतर ११ राज्यांमध्ये मुस्लीम लोकसंख्येची आकडेवारी किरकोळ होती, ती राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ५% ही नव्हती.

भारतात मुस्लिम बहुसंख्य झालेला भारत कसा असेल? इतर धर्मांची लोकसंख्याही अशीच वाढेल का?! जर होय, तर हे जगासाठी कसे असेल?

हि आकडेवारी अश्विनी उपाध्याय यांनी केलेल्या दाव्याला खोटी ठरवते. Scroll.in ने जनगणनेच्या डेटावरून असे निरीक्षण नोंदवले आहे की भारतातील मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होण्यासाठी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल २२० वर्षे लागतील – आणि तसे झाल्यास, प्रत्येक गटाची लोकसंख्या ५६ अब्ज आणि एकूण लोकसंख्या ही ११२ अब्ज असेल आणि मग लोकसंख्येची घनता इतकी असेल की जगासाठी अत्यंत दाटीवाटीची परिस्थिती निर्माण होईल!

स्क्रोलच्या मते, प्रत्येक भारतीय मुसलमानामागे पाच भारतीय हिंदू आहेत आणि ही संख्या अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. आज प्रत्येक भारतीय ख्रिश्चनांमागे  सुमारे ३५ हिंदू आहेत.

हे झालं भविष्याबद्दल. भारताच्या भूतकाळाचे कायउपाध्याय यांच्या आरोपानुसार लोकसंख्येत एवढी लक्षणीय वाढ झाली आहे का, की ज्यातून एक भयंकर कट उघड होईल?

इतिहास उपाध्याय यांच्याशी सहमत असल्याचे दिसत नाही. अमेरिकेतील प्रसिद्ध थिंक टँक प्यू रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, १९४७ पासून भारताची धार्मिक लोकसंख्येची रचना वाढीच्या दराच्या बाबतीत तुलनेने स्थिर आहे. जीवनशैलीतील बदल, रोजगाराचे प्रमाण अशा विविध कारणांमुळे भारतात स्वातंत्र्यानंतर सर्व धार्मिक आणि अधार्मिक गटांच्या लोकसंख्येत वाढ झाल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मात्र, एकाही धार्मिक गटाच्या लोकसंख्येत कमालीची ‘स्फोटक’ वाढ झालेली दिसून आली नाही.


(स्रोत: Scroll.in)

हिंदूंचा प्रजनन दर देखील २.४ प्रति महिला प्रति मुले या जागतिक सरासरीवर राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, २०२२ मध्ये खुद्द भाजप सरकारच्या काळात प्रसिद्ध करण्यात आलेल्या राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षण – ५ (एनएफएचएस) नुसार भारतात मुस्लिमांचा प्रजनन दर विशेषतः हिंदूंच्या तुलनेत कमालीचा घटत चालला आहे. १९९३ पासून त्यात ५० टक्क्यांनी घट झाली आहे, अगदी जम्मू-काश्मीरसारख्या केंद्रशासित प्रदेशात, जिथे मुस्लिमांची तुलनेने जास्त लोकसंख्या आहे, मुस्लिमांचा प्रजनन दर चिंताजनक दराने घसरला असून तो भारतातील कोणत्याही राज्यातील हिंदूंपेक्षा कमी आहे. मुस्लिमांची संख्या ३५% असलेल्या आसाममध्येदेखील या गटाच्या प्रजनन दरात २००५-०६ पासूनची सर्वात मोठी घसरण झाली आहे.


(स्रोत: टाइम्स ऑफ इंडिया)

सध्याच्या ट्रेंडवर आधारित प्यू रिसर्च इन्स्टिट्यूटच्या लोकसंख्येच्या अंदाजानुसार २०५० पर्यंत हिंदूंचा प्रजनन दर २.४ मुले प्रति महिला ह्या जागतिक सरासरीवर राहील. ही आकडेवारी हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबद्दल उपाध्याय यांनी केलेले कोणतेही दावे खोडून काढतात, मग ते वाढीच्या दराबाबत असोत, किंवा लोकसंख्या वाढीबाबत – किंवा प्रजनन दराबाबत असोत.

गरिबांना जास्त मुलं का होतात?

मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर हा हिंदूंच्या वाढीच्या तुलनेने जास्त आहे. सध्याच्या ट्रेंड्सच्या आधारे, सांख्यिकीय अंदाज निश्चित आहे की हा विकास दर स्थिर आहे आणि वर्षानुवर्षे घसरत असल्यामुळे तो थांबेल. मात्र, मुस्लिमांमधील ह्या उच्च वाढीच्या आणि प्रजनन दराला सामाजिक आणि राजकीय शक्तींनी मोठ्या प्रमाणात बदनाम केले आहे, या गोष्टीचा संबंध धर्माशी नव्हे तर आर्थिक वंचिततेशी आणि असुरक्षिततेशी आहे, हे समाजशास्त्रीय आणि मानववंशशास्त्रीयदृष्ट्या सिद्ध केले गेले असले तरीही. ‘भरपूर’ मुले असणे हे देखील सामान्यत: दारिद्र्याशी संबंधित असते. विशेषत: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचा वाढीचा दर मुस्लिमांपेक्षाही जास्त आहे. दारिद्र्य हा बऱ्याचदा अनेक कारणांपैकी एक कारणीभूत घटक असतो. ज्या पालकांकडे निवृत्तीचे लाभ नाहीत किंवा शाश्वत काम नाही आणि ते रोजंदारीवर काम करणारे आहेत, त्यांना मुले असल्याने म्हातारपणी मदत आणि आधार मिळतो. रोजगाराचे दर, महिला साक्षरता, तसेच विकासाचे निर्देशांक हे घटकही निर्णायक ठरतात. भेदभावरहित प्रशासन, गुणवत्तापूर्ण प्राथमिक आणि प्रतिबंधात्मक आरोग्य लाभांची उपलब्धता आणि उच्च महिला साक्षरता हे घटक देखील जगभरात महिलांना कमी मुले असण्याशी संबंधित आहेत.

म्हणूनच, अश्विनी उपाध्याय यांच्या दाव्यांना सरकारी आकडेवारीसह मांडले असता हे स्पष्ट होते की, मुस्लिमांची ‘अतिलोकसंख्या’, वेगाने वाढ आणि हिंदूंची घटती लोकसंख्या या भोवती जो प्रचंड गदारोळ माजवला जात आहे तो केवळ उजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांनी देशावर आणि त्याच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांवर हल्ला करण्यासाठी लादलेल्या भावना भडकावणाऱ्या द्वेष-मोहिमेचा एक भाग आहे.

अश्विनी उपाध्याय कोण आहेत?

अश्विनी उपाध्याय हे भारतीय जनता पक्षाच्या (बीजेपी) दिल्ली विभागाचे माजी प्रवक्ते आहेत. मात्र, त्यांच्या राजकीय ताकदीपेक्षा ते सर्वोच्च न्यायालयात धार्मिक मुद्द्यांशी संबंधित विषयांवर जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्याच्या त्यांच्या आग्रही पद्धतीसाठी प्रामुख्याने ओळखले जातात. उपाध्याय यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात विविध जनहित याचिका दाखल केल्या आहेत, ज्यात त्यांनी हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा देण्याच्या याचिकेपासून ते मुघल राजांची नावे दिलेल्या अनेक ठिकाणांची नावे बदलण्याची मागणी केली आहे. ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ने २०१८ मध्ये दिलेल्या वृत्तानुसार उपाध्याय यांच्या नावावर पाच वर्षांत ५० जनहित याचिका दाखल करण्याचा विक्रम आहे. त्यांच्या अनेक दाव्यांमधून, विशेषतः सोशल मीडियावरील, अनेकदा मुस्लिम आणि ख्रिश्चनांबद्दलची निश्चित पूर्वग्रहदूषित वृत्ती दिसून येते. त्यांचे हे दावे, ज्यापैकी चार दावे सीजेपीने खोडून काढले आहेत, हे अनेकदा चुकीच्या माहितीच्या आणि प्रोपगंडाच्या दिशेने जाणारे असतात.

या माणसाची तपशीलवार प्रोफाइल येथे वाचा.

Who is Ashwini Upadhyay?

द्वेषाचा प्रभावीपणे आणि त्वरीत नायनाट करणे गरजेचे आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचा व्यापक सहभाग महत्त्वाचा आहे.

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Go to Top
Nafrat Ka Naqsha 2023