धर्माच्या नावावर राजकारण करणे योग्य नाही, राम मंदिर मुद्दा होऊ शकत नाही – तिस्ता सेटलवाड
औरंगाबाद, दि.30(डि-24 न्यूज) देश संविधानाने चालतो पण संविधानाची शपथ घेऊन संविधान मानत नसतील तर हे देशाचे दुर्दैव आहे. संसदेत मनमानी पद्धतीने कायदे बनवले जात आहे तर काही कायदे बदलले जात आहे. वेगवेगळ्या जात धर्म वेगवेगळे विचारधारा असलेले लोकप्रतिनिधी संसदेत निवडून आले पाहिजे. लोकशाही टिकून राहण्यासाठी व संविधान वाचवण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी आज येथे व्यक्त केली ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी कॉ. ॲड. मनोहर टाकसाळ यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेला उपस्थित राहण्यासाठी तिस्ता सेटलवाड या गुरुवारी औरंगाबाद शहरात आल्या होत्या यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यापुढे बोलताना म्हणाल्या निवडणुकीत राम मंदिर व बाबरी मस्जिद या मुद्यावर निवडणूक होणार हे लोकशाहीला घातक आहे. पाच राज्यांतील निवडणूकीत राम मंदिराचे दर्शन मोफत घडवले जाईल असे आमिष मतदारांना दाखवले गेले हे चुकीचे आहे. जात, धर्म, आस्थेच्या नावाने राजकारण करणे हे चुकीचे आहे. राज्य घटनेत देशातील नागरिक म्हणून संबोधले आहे. त्यामध्ये जात व धर्माचा उल्लेख नाही मग निवडणूक जिंकण्यासाठी मंदिर व धार्मिक आस्थेच्या आडून राजकारण करणे बरोबर नाही. बिल्कीस बानो केसमध्ये सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे. निकालाची प्रतिक्षा आहे. आम्हाला न्याय मिळेल. जे आरोपी सरकारने सोडले त्याबाबतचा निर्णय चुकीचा होता. आरोपी आरोपी असतो त्याचे समर्थन करता येणार नाही. कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये हि आपली भुमिका आहे. मानवता धर्मासाठी लोकचळवळ मजबूत करण्याची सध्या गरज आहे असेही त्या म्हणाल्या त्यापूर्वी पैठणगेट ते जिजाऊ मंदिर पर्यंत अभिवादन रॅली काढण्यात आली. यामध्ये शहरातील मान्यवर उपस्थित होते. व्यासपीठावर सचिव मंडळ सदस्य भाकपा काॅ.प्रा.राम बाहेती, अध्यक्षस्थानी प्रा.डाॅ.वासूदेव मुलाटे उपस्थित होते.
जेष्ठ पत्रकार स.सो.खंडाळकर, काॅ.भिमराव बनसोडे, सरचिटणीस अॅड वैशाली डोळस, प्रा.भारत सिरसाट, अॅड के ई हरिदास, साथी सुभाष लोमटे, अॅड रमेशभाई खंडागळे, अॉड काॅ. भगवान भोजने, काॅ.अभय टाकसाळ उपस्थित होते.
The Original piece may be read here