माणसांच्या गुलामगिरीची गोष्ट

by | Kahaniya, Marathi Kahaniya, Uncategorized | 0 comments

लाला आणि कबीर एकाच शाळेत जायचे. गावात एकूण शाळा दोन. त्यातली ह्यांची एक शाळेकडे जाणारा रस्ता रेल्वे लाईनच्या जवळून जायचा. याच रस्त्यावरच त्या दोघांची पहिल्यांदा गाठभेट झाली. कबीर गळ्यात दप्तर अडकवून चालताना आपल्या काल्पनिक मित्रांशी बोलत राहायचा. चालत चालत बाजाराच्या वळणावर तो नेमका ८.२०ला पोहचायचा. लालाही त्याच वेळेला तिथे यायचा. दोघंही नित्यनियमाने एकमेकांची वाट पाहत थांबायचे आणि मग रमतगमत शाळेत पोहचायचे. असा त्यांचा दिनक्रमच ठरून गेला होता. इतर लोकांनाही ही लंबू ठेगूंची जोडी त्या रस्त्यावर पाहण्याची सवय होऊन गेली.

वाढत्या वयाबरोबरच येणारे अनेक प्रश्नही एकमेकांना ते सांगायचे. असे अनेक मौल्यवान क्षण त्यांनी एकमेकांसोबत घालवले. तारुण्यातल्या इच्छाआकांक्षा आणि गमतीच्या पलिकडचं जे जग होतं त्याचा परिणाम आता जाणवू लागला होता. भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्या शौर्याच्या अनेक कथा या शहरात सांगितल्या जात. लाला आणि कबीर ही या विषयांवर जोरदार चर्चा त्यांच्या नेहमीच्या भटकण्याचा वेळ कमी आणि अनियमित होऊ लागला. हळूहळू काहीतरी संकट येणार याची चिन्हं दिसू लागली. विद्वेष आणि हिंसेने भारलेलं वातावरण निर्माण होऊ लागलं. या आधी लालाच्या आई वडिलांनी त्याचे मित्र कोण आहेत? ते कुठे भेटतात? काय बोलतात याची कधीच चौकशी केली नव्हती. एके दिवशी ते दोघे भेटले तेव्हा कबीरच्या डोळ्यात अश्रू होते. लालाला भेटायला येत असताना वाटेत त्याला पाच सहा दांडगेल्या मुलांनी अडवून मारहाण केली. त्यांच्या मारहाणीपेक्षाही त्याला दुखावून गेले ते त्यांचे शब्द, “साल्या तुझी हिंमत कशी झाली आमच्या रस्त्यांवरून फिरण्याची? देशद्रोहयांनो, पाकिस्तानची मागणी करता काय?

अकरा वर्षाचा कबीर लालाला पुन्हा पुन्हा सांगत होता, “मला इथून कुठं कुठं जायचं नाहीये. आपली लग्न होईपर्यंत आपण एकत्रच राहणार आहोत असं आपलं ठरलंय ना? झालं त्याबद्दलची आपली नाराजी व्यक्त लाला कबीरचं सांत्वन करत राहिला.

अचानकच आतापर्यंत सुप्त अवस्थेत असणाऱ्या तणावाचा स्फोट झाला होता. ज्या स्वातंत्र्याची आबालवृद्धांनी चातकासारखी वाट पाहिली होती ते आता दृष्टीक्षेपात आलं होतं. पण त्याच्या सोबतीला होता भीषण रक्तपात. कबीर आणि त्याचे कुटुंबिय भयभीत झाले होते. व्हॉईसरॉयच्या बंगल्यात बसून आखलेली फाळणीची रेषा अंबाला शहरालाही विभागून गेली. अनेक मुस्लिम कुटुंबियांची इच्छा नसतानाही त्यांना पाकिस्तान या नव्या देशात जावं लागणार होतं.

कबीरच्या कुटुंबालाही पाकिस्तानात जायचं नव्हतं. कबीर आणि लालावर तर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. त्यांच्या हातात नसलेल्या काही घटनांमुळे त्यांची स्वप्नं, आशाआकांशा धुळीला मिळाल्या होत्या.

एके रात्री गर्द अंधारात लालाला घराचं दार कुणीतरी ठोठावतंय असं वाटलं. पाहतो तर दारात नखशिखांत थरथरणारा कबीर उभा होता. आपल्याला अडचणीच्या वेळी लालाच वाचवू शकेल या आशेने तो आला होता. त्याच्या घरावर हल्ले होत होते, त्याला कुत्सित शेरे ऐकायला लागत होते. त्यामुळे त्याच्या घरच्यांची खात्री पटली होती की आपला जीव आणि मूलीबाळींची इभ्रत इथं सुरक्षित राहू शकणार नाही. कबीरचे डोळे लालाकडे अधिरपणे बघत होते.

क्षणभर विचार करून लाला काही निर्धार करूनच आपल्या वडीलांजवळ गेला. एकीकडे तो भीतीने थरथरत होता. अशा अवस्थेतच त्याने बाबांना विनंती केली. त्याला वाटलं की आता त्यांच्या संतापाचा भडका होईल. पण तसं झालं नाही. बाबा शांतच होते. बऱ्याच काळाने त्यांनी संमतीदर्शक मान डोलावली. मग कबीरचे कुटुंबीय लपतछपत लालाच्या घरात शिरले, आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या तीन रात्री आणि चार दिवस त्यांनी लालाच्यांच घरात घालवले. सारं वातावरणच द्वेषाच्या भावनेनं दूषित झालेलं होतं. कबीर आणि लालाच्या कुटुंबियानी प्रदीर्घ चर्चा केली आणि त्यानुसार चौथ्या रात्री कबीरच्या कुटुंबियानी तीन ट्रक आणि सहा गाठोडी भरलेलं सामान घेऊन बाहेर पडायचं ठरवलं. लालाच्या मोठ्या भावाने त्यांची स्टेशनपर्यंत सोबत केली. निघण्याआधी लाला आणि कबीर यांना पंधरा मिनिटं एकमेकांच्या सहवासात राहू देण्याची परवानगी दिली गेली. तो संपूर्ण वेळ दोघं एकमेंकांचा हात घट्ट धरुन होते.

दोघांच्याही तोंडून शब्द फुटत नव्हते. आता बोलण्यासारखं काय उरलं होतं?

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *