कुर्ला हा मुंबईतील दाट लोकवस्ती असलेला एक भाग आहे. मुंबइचे जवळपास सर्वच भाग हे लोकांनी गजबजलेले असतात. येथे देखील निरनिराळ्या प्रकारचे लोक राहतात. वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये लोक गटगटांनी राहतात. बरेच मुस्लिम आणि हिंदू कुर्ल्यात राहतात.
परंतु, एका विशिष्ट रस्त्यावर एक इमारत आहे ज्यामध्ये बहुतांशी मुस्लिम वस्ती आहे. या इमारती शेजारीच एक मशीद आहे. ज्यामध्ये हे लोक प्रार्थना करतात. मागच्या आठवडाभर अशा परिसरात राहणारे लोक भयभीत झालेले होते. काही लोकांनी कंडया पिकवल्यामुळे इतर लोकही तणावग्रस्त झालेले होते. त्याच इमारतीजवळ रात्री १ वाजता हा प्रसंग घडला. इतर ठिकाणी आपल्या प्रयत्नात अयशस्वी ठरलेला हा रक्तपिपासू, बेभान जमाव या इमारतीजवळ आला आणि तिथे राहणाऱ्या मुस्लिमांनी एक एक करून रांगेने बाहेर यावे यासाठी रात्रीच्या भयाण काळोखात ओरडू लागला. त्या इमारतीतील प्रत्येक जण, पुरुष, स्त्रिया, लहान मुलं, सगळेजण भीतीने थरथर कापत हे ऐकत होते पण त्यांच्यातील कुणीही बाहेर आले नाही.
काही काळ निश:ब्द शांतता पसरली. त्या इमारतीतल्या भयभीत लोकांना त्या धाडसी स्त्रीचा आवाज ओळखीचा वाटत होता परंतु त्या बेभान जमावापासून ती एकाकी स्त्री आपल्याला वाचवू शकेल याची खात्री त्यांना वाटत नव्हती. तरीदेखील ते लोक वाट पाहत राहिले (त्याशिवाय त्यांच्या हातात काय होत?)
काही मिनिटे अशीच गेली. पुन्हा काही मिनिटे. अचानक, ती भयाण शांतता संपली आणि जमाव हळूहळू विखुरला गेला, त्या जमावातले लोक एक एक करून मागे वळले आणि दिसेनासे झाले. सर्व माणसे एक एक करून निघून चालली आहेत हे पाहून त्या जमावाचा म्होरक्याही खाल मानेने निघून गेला. सांगायची गोष्ट अशी की तो त्या धाडसी वृद्ध स्त्रीचा मुलगाच होता.
0 Comments