एक विचित्र व्हिडिओ सध्या सर्वत्र फिरत आहे. त्याचं शीर्षक आहे, “भारताचा लेबनॉन कसा बनेल | लोकसंख्या-स्थिती आणि लोकसंख्या विस्फोटाचा खेळ”, आणि त्याची निर्मिती अनंता सर्गा प्रॉडक्शनची असून त्यांचे सह-संस्थापक वरुण कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले आहे आणि तोव्हिडिओ त्यांच्या ब्रीदिंगहिस्टरीया युट्युबचॅनलवरअपलोड केला आहे. त्याची सुरुवात ‘लेबनॉनच्या बाबतीत जे काही घडलं तेच भारताबरोबर घडेल’, या निष्कर्षापासून होते. या व्हिडीओतअँकरदेशाचा उल्लेख इंडिया नव्हे तर नेहमी फक्त भारत असा करतो, जशा बहुतेक हिंदुत्ववादी गटांनी आपल्या फॉलोअर्सना सूचना दिल्या आहेत.
“जर आपण वेळीच जागे झालो नाही, तर भारताला दुसरे लेबनॉन होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही,” असं ते म्हणतात. आणि, ते “समजावून” सांगतात की, “५० च्या दशकात मॅरोनाइट ख्रिश्चन लोक कसे तिथे बहुसंख्य होते आणि इस्रायलसह हे या भागातले केवळ दोन लोकशाही देश होते. हे या भागातील हे दोनच “गैर-मुस्लिम देश” होते यावर ते भर देऊन पुढे म्हणतात, “यातून तुम्हाला जे काही निष्कर्ष काढायचे आहेत ते तुम्ही काढू शकता.” ख्रिश्चन आणि मुस्लिमांसह सर्व “निर्वासितांनी” लेबनॉनमध्ये गर्दी केली याचा ते पुढे शोध लावतात. “पीएलओसारख्या दहशतवादी संघटना” त्यांचे राजकारण “डाव्या विचारसरणीच्या बॅनरखाली” कशा करत होत्या आणि कशाप्रकारे स्वतःलाच “बळी” म्हणून सादर करत होत्या या त्यांच्या दाव्याचे समर्थन करणारा एक नाट्यमय साउंडट्रॅकही अर्थातच ऐकायला मिळतो. ते पुढे म्हणतात, “मला आशा आहे की तुम्ही यातील भयंकर समानता पाहू शकाल” आणि मुस्लिम लोकसंख्येच्या वाढीसाठी “अंतर्गत लोकसंख्या स्फोट” आणि “निर्वासित” जबाबदार असल्याचा दावा करतात.
CJP द्वेषयुक्त भाषणाची उदाहरणे शोधण्यासाठी आणि प्रकाशात आणण्यासाठी समर्पित आहे, जेणेकरून या विषारी कल्पनांचा प्रचार करणार्या धर्मांधांचा मुखवटा उघडून त्यांना न्याय मिळवून देता येईल. द्वेषयुक्त भाषणाविरुद्धच्या आमच्या मोहिमेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया सदस्य व्हा. आमच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी, कृपया आताच देणगी द्या!
त्यानंतर ते दावा करतात की, “भारतही लेबनॉनच्या दिशेने चालला आहे.” ते म्हणतात की, “त्यांनी निर्वासितांना आत येऊ दिले”, आणि कसे ‘हे लंगरसारखे होते’ हे सोप्या पद्धतीने स्पष्ट करतात, परंतु लोकसंख्यास्थिती बदलली आणि “हल्ले” सुरू झाले. त्यांचा दावा आहे की भारतात हे घडत आहे आणि “आसामची लोकसंख्या” हे याचे एक उदाहरण आहे आणि कशाप्रकारे “भारतातील आठ राज्यांमध्ये” आता “हिंदू बहुसंख्य राहिले नाहीत” असाही दावा ते पुढे करतात. ते म्हणतात की भारताला “लोकसंख्येचा खेळ समजलेला नाही” आणि भारतीय हिंदू “सांस्कृतिक अस्तित्वाच्या मुद्द्यांकडे” लक्ष देत नाहीयेत आणि सहजपणे त्यांचे लक्ष भरकटत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान हे “बेकायदेशीर निर्वासितांना” पाठिंबा देत असल्याचा त्यांचा दावा आहे.
त्यानंतर हा मनुष्य आता “जागे होऊ लागलेल्या” हिंदुत्ववादी गटांचे कौतुक करून आणि “आम्ही सण कसे साजरे करायचे हे आम्हाला शिकवू नका” यासारख्या गोष्टी बोलतो, कदाचित त्याचा रोख दिवाळीशी संबंधित प्रदूषणाबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या चिंतेकडे असावा. आणि हे बोलून तो त्याच्या सांप्रदायिक बडबडीचा समारोप करतो. त्यांनी या व्हिडिओच्या वर्णनात म्हटले आहेकी, “पुढील लेबनॉन बनण्याच्या भारत किती भितीदायकपणे जवळ पोहोचला आहे हे समजून घेण्यासाठी (आणि आशा आहे की याची जाणीव होण्यासाठी) हा व्हिडिओ पहा. इतरही युरोपियन देश याला बळी पडत आहेत,” असा दावा करून ते कृतीचे आवाहन करताना लिहितात, “जागे होण्याची आणि याबद्दल काहीतरी करण्याची वेळ आली आहे.”
तथापि, त्यांचे द्वेषपूर्ण दावे आणि अफवा प्रत्यक्ष वास्तवाच्या कसोटीवर पूर्णपणे फोल ठरतात. कार्नेजीएंडोव्हमेंट फॉर इंटरनॅशनल पीस या संस्थेच्या वेबसाइटने तपशीलवार सांगितल्याप्रमाणे, १९२६ पासून लेबनॉनच्या संविधानात अनेक वेळा, म्हणजे १९२९, १९४३, १९४७ आणि १९९० मध्ये सुधारणा करण्यात आल्या. “अगदी अलीकडील १९९० च्या राज्यघटनेत (येथे इंग्रजी, अरबी आणि फ्रेंच भाषेतील आवृत्ती आहे) अशी तरतूद आहे की मंत्रिमंडळात आणि संसदेमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिमांची संख्या समान असेल. “घटनादुरुस्ती ही राष्ट्रपतींच्या किंवा संसदेच्या विनंतीनुसार केली जाऊ शकते. दुरुस्ती प्रक्रिया (कलम ७६ आणि ७७) सुरू करण्यासाठी दोन तृतीयांश जागा आवश्यक आहेत” आणि “२००८ चा दोहा कराराही (इंग्रजी मजकूर) याला पूरक आहे, ज्यामुळे पश्चिम आणि सौदी समर्थित बहुसंख्य आणि सीरियासमर्थकविरोधकयांच्यातील अठरा महिन्यांची राजकीय कोंडी आणि त्यानंतरचा हिंसक उद्रेक संपला.”
इतिहासकार आणि कायदेतज्ज्ञ अशा प्रकारच्या ठराविक सांप्रदायिक मतप्रवाह निर्माण करण्याचा उद्देश असलेल्या चॅनल्सनी केलेल्या दाव्यांचा पर्दाफाश करू शकत असले तरीही चिंतेचे कारण हे आहे की अशा चॅनेल्सनायुट्युबद्वारे कोणत्याही नियंत्रणाशिवाय व्हिडीओ प्रसारित करण्याची परवानगी दिली जाते. अनेक ग्रुप्सवर तो शेअर केला जात आहे. अनंत सर्गा प्रॉडक्शनची स्थापना मूळचे अभियंते आणि आता फिल्ममेकर्स बनलेले प्रीतम के. तिवारी आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे वरुण कुलकर्णी यांनी केली आहे. ब्रीदिंगहिस्टरीआणि अनंत सर्गा हे विविध विषयांवरचे हिंदुत्ववादी विचारसरणीचे, शैलीदार सादरीकरण असलेले व्हिडीओ बनवण्यात पारंगत आहेत. इतिहास, वस्तुस्थिती आणि वस्तुनिष्ठता हे अशा प्रकल्पांमध्ये सर्वाधिक बळी ठरतात.
फोटो सौजन्य: ट्विटर
अनुवाद सौजन्य – चिराग देशपांडे
संबंधित लेख –
Hate Buster: Propaganda video claims India becoming Lebanon