द्वेष पसरवणारा सुरेश चव्हाणके याने पुन्हा एकदा अभिनेता शाहरुख खान याला त्याच्या मुस्लिम असण्यावरून लक्ष्य केले आहे. रविवार ६ फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीदरम्यान खानने त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि आदरांजली वाहिली. लतादीदींच्या पार्थिवाजवळ त्याने त्याची मॅनेजर पूजा दादलानीसोबत प्रार्थना केली, तिने प्रार्थनेसाठी तिचे हात जोडले. त्यानंतर खानने पारंपरिक ‘दम’ केला किंवा बाजूला हळूवार फुंकले. ‘वाईट नजर’ दूर ठेवण्याचा किंवा ‘दुष्ट आत्मा’ आणि नकारात्मकतेला दूर ठेवण्याचा एक प्रतीकात्मक मार्ग म्हणून असे केले जाते.
लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले आणि अनेक अभिनेते, गायक, राजकारणी, ख्यातनाम व्यक्ती त्यांच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहिल्या होत्या. हे अंतिम संस्कार संपूर्ण शासकीय इतमामात शिवाजी पार्क, मुंबई येथे पार पडले. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय, ज्येष्ठ राजकारणी शरद पवार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अभिनेता शाहरुख खान देखील मेलडी क्वीनच्या पार्थिवाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होता.
मात्र, वारंवार द्वेष पसरवणाऱ्या सुरेश चव्हाणके याने शाहरुखने “दुष्टात्म्यांपासून रक्षण” म्हणून, किंवा काहींच्या मते “स्वर्गवासासाठी शुभेच्छा” म्हणून, पार्थिवावर हळूवारपणे हवा फुंकून आपली दुआचा संपवतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, आणि त्याऐवजी हा अभिनेता “थुंकत होता” असा दावा केला. शाहरुखने केलेल्या प्रार्थनेबद्दल ‘प्रश्न विचारा आणि वस्तुस्थिती खोदून काढा’ यावर चर्चा केल्याचे भासवून त्याने सांप्रदायिक दावा पसरवण्याचा प्रयत्न केला.
सीजेपी हेट स्पीचची उदाहरणे शोधण्यासाठी आणि उजेडात आणण्यासाठी समर्पित आहे, जेणेकरून या विषारी कल्पनांचा प्रसार करणाऱ्या धर्मांधांचा मुखवटा फाडता येईल आणि त्यांना शिक्षा मिळू शकेल. द्वेषपूर्ण भाषणाविरुद्धच्या आमच्या मोहिमेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया सदस्य बना. आमच्या उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी, कृपया आता देणगी द्या.
चव्हाणके याने मुद्दाम “थुंकण्याची” ही खोटी बातमी पसरवली आणि उजव्या विचारसरणीच्या परिसंस्थेतील इतरांनी ती हातोहात उचलून धरली. सांप्रदायिकतेला लक्ष्य करणारी ही खोटी बातमी लगेच ऑनलाइन व्हायरल झाली.
परंतु चव्हाणके आणि त्याच्या खोट्या बातम्यांना हवा देणाऱ्या इतरांचे तोंड उजव्या विचारसरणीच्या इकोसिस्टममधील काही जणांसह ट्विटरवरील अनेक व्हेरिफाईड हँडल्सनी बंद केले. परंतु चव्हाणके यांनी पुन्हा एकदा ऑनलाइन सांप्रदायिक द्वेष निर्माण केल्याबद्दल आणि खान यांना त्यांच्या मुस्लिम अस्मितेसाठी लक्ष्य केल्याबद्दल अद्याप दिलगिरी व्यक्त केलेली नाही.
त्याऐवजी चव्हाणकेने त्याच्या ट्रेडमार्क बिंदास बोल कार्यक्रमात एक संपूर्ण शो केला, ज्याचे शीर्षक होते शाहरुख लतादीदींवर थुंकला का किंवा त्याने काय केले? त्याने विचारले की, शाहरुखने त्याचा मास्क का काढला? “हा इस्लामिक विधी आहे का?” असे म्हणत त्याने त्याच्या टीव्ही शोमध्ये त्याची अडाणी बडबड सुरूच ठेवली आणि म्हटले, “मला तरी अशा कोणत्याही विधीबद्दल माहिती नाही. एका भारतरत्न व्यक्ती विरोधात एवढे मोठे कृत्य आपण कसे काय सहन करू शकतो?”
एखाद्या हताश हिंदी सिनेमाच्या चाहत्याप्रमाणे सुदर्शन न्यूजचा मालक आणि ‘एडिटर’ सुरेश चव्हाणके गेल्या काही काळापासून सुपरस्टार चित्रपट अभिनेता शाहरुख खानचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे. चव्हाणके शाहरुखच्या मागे लागण्यासाठी तथाकथित ‘शोधपत्रकारिता’ असल्याचा दावा केलेल्या त्याच्या कुप्रसिद्ध ‘एक्सपोज’ शैलीचा वापर करतो. गेल्या वर्षी चव्हाणकेने शाहरुख खान हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचा आहे असा दावा करणाऱ्या किंवा तो पाकिस्तानी क्रिकेटपटूंची बाजू घेतो, किंवा १८ व्या शतकातील म्हैसूरचा शासक टिपू सुलतानवर बनलेल्या चित्रपटात काम केल्याबद्दलच्या त्याच्या जुन्याच कॉन्स्पिरसी थेअरींचे पुन्हा पॅकेजिंग केले. खरंतर तथाकथित ‘टिपू फिल्म’ आणि त्याचं पोस्टर २०२० मध्ये खोटं असल्याचं सांगण्यात आलं होतं.
Image Courtesy: NDTV