देशात वाढणारा द्वेष संपण्यासाठी ‘हेट हटावो’ अॅप Eenadu India

01, Feb 2019

मुंबई – देशात द्वेष वाढत चाललेला आहे. हा द्वेष संपवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या सीजेपी चमुने ‘हेट हटावो’ या अॅपची निर्मिती केली आहे. महात्मा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त या अॅपचे अनावरण करण्यात आले.

समाजमाध्यमांवर द्वेष पसरवणारे अनेक व्हिडिओ असतात. या व्हिडिओमुळे समाजात दरी निर्माण होत आहे. या व्हिडिओचे मूळ शोधण्याचे काम या अॅपच्या माध्यमातून केले जाणार आहे. या अॅपमध्ये अशा व्हिडिओबद्दल तक्रार नोंदवता येणार आहे. पहिल्याच दिवशी या अॅपला भरभरून प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा – वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षेत ‘मास’ कॉपी
अॅपच्या माध्यमातून वाईट प्रवृतीचे मूळ उखडून टाकण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अॅपवर एखादा शिव्या देणारा किंवा कोणाचा अपमान करणारा, चुकीचा संदेश देणारा व्हिडिओ, संदेश असेल तर त्याचा स्क्रीनशॉट अपलोड केल्यावर त्याची दखल या अॅपच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. अशा व्हिडिओची दखल घेवून त्याची संबंधित एजन्सीकडे तसेच पोलीसांत तक्रार केली जाणार आहे. फेक न्यूज या विषयावर देखील काम केले जाणार असल्याचे सेटलवाड यांनी सांगितले.

 

The complete original article with the video may be seen here.

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Go to Top
Nafrat Ka Naqsha 2023